ग्रुप ग्रामपंचायत सोनावे

    २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार सोनावे (मुकाम सोनावे, पोस्ट पारगाव ४०११०२) या गावात सुमारे ५५० ते ६५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. एकूण लोकसंख्या अंदाजे २८०० ते ३२०० च्या दरम्यान असून पुरुष व महिला यांचे प्रमाण जवळपास समसमान आहे. गावात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते भातशेती, भाजीपाला तसेच हंगामी पिकांवर अवलंबून असतात. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टीवरील काम, बांधकाम मजुरी तसेच इतर कष्टाची कामे करतात. याशिवाय काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन आणि लहान स्वरूपातील व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.
श्रावण महिन्यात, विशेषतः गणपती उत्सवाच्या आधीच्या काळात, जेव्हा ढगांचा गडगडाट होतो आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असतो, तेव्हा एक वेगळ्याच निसर्गरम्य वातावरणात रानात एक नैसर्गिक भाजी उगवते, जिला ‘अळंबी’ असे म्हणतात. ही भाजी अतिशय चवदार आणि पौष्टिक असते. मात्र ती उगवल्यानंतर लगेचच काढावी लागते, अन्यथा ती पटकन फुलून खाण्यास अयोग्य होते. त्यामुळे पहाटे लवकर उठून गावातील लोक रानात जाऊन अळंबी शोधतात, ती फुलण्याआधीच खुडून स्वच्छ करून लगेच बाजारात विक्रीसाठी नेतात. पावसाळ्यात आदिवासी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा आणि अल्पकालीन रोजगाराचा स्रोत ठरतो.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२६५०
पुरुष लोकसंख्या
१३४८
महिला लोकसंख्या
१३०२
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४४०
अनुसूचित जाती (SC %)
०.६%
अनुसूचित जमाती (ST %)
७१.७%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय   
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center)   
अंगणवाडी  

 

 
प्राथमिक शाळा   
माध्यमिक शाळा   
उच्च माध्यमिक शाळा   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमी   
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत सोनावे 

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

शाखेचे नाव: शाखा पालघर 

अकाउंट नंबर : 004700300001005 

आई एफ एस सी कोड : TDCB0000047

पत्ता : पालघर शाखा कचेरी रोड, कॉंग्रेस भवन (401404)